धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट आली आहे. येत्या 14 ऑक्टोबर रोजी तारखेला धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग काही अंतरापुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. यापार्श्वभीवर पर्यायी महामार्ग देखील जाहीर करण्यात आले आहे. वाहतूक बंद करण्याचे आदेश बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काढले आहेत. (Latest Marathi News)
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची 14 ऑक्टोबर रोजी तारखेला जालन्याच्या सराटे अंतरवाली येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा जवळपास 100 एक्करवर होणार आहे. यासाठी शासकीय आकडेवारीनुसार 5 ते 6 लाख मराठा बांधव येण्याची शक्यता आहे.
जरांगे पाटील यांच्या सभेला 30 हजार ते 35 हजार वाहने देखील दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तब्बल सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महामार्ग धुळे-सोलापूर महामार्ग बंद राहणार आहे. यामुळे बीड पोलीस अधिक्षकांनी पर्यायी महामार्ग रस्ता जाहीर केले आहेत.
1) बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्यांसाठी...
बीड- पाडळसिंगी- मादळमोही- खरवंडी- पाथर्डी- शेवगाव- पैठण- छत्रपती संभाजीनगर किंवा बीड- पाडळसिंगी- खरवंडी- पैठण- छत्रपती संभाजीनगर असा राहील.
2) बीडहून जालन्याला जाण्यासाठी...
बीड- गढी- माजलगाव- आष्टी- घणसांगवी- अंबड- जालना असा असेल मार्ग
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक तासांचा विशेष ब्लॉक
दरम्यान, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील वाहतुकीबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. या मुंबई-पुणे महामार्गावर उद्या अर्थात गुरुवारी दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत वाहतूक बंद असणार आहे. ओव्हरहेड ग्रॅन्टी बसविण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर १ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक घेताना सर्व प्रकराची ब्लॉक घेताना प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.