Solapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: सोलापूर हादरले! शाळेमध्येच शिपायाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, बाथरूममध्ये न्यायचा अन्...

Solapur Police: सोलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली. सोलापूरमधील नामांकित शाळेमध्ये ही घटना घडली. या शाळेमधील शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी या शिपायाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरमधील एका शाळेमध्ये शिपायाने चिमुकल्या मुलीचा लैंगिक छळ केला. या शिपायाने शाळेच्या परिसरातील बाथरुममध्ये नेऊन या मुलीचा लैंगिक छळ केला. पीडित मुलीच्या शरीरावरील विविध भागांवर या शिपायाने चिमटे काढत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पीडित मुलीने हा संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ५५ वर्षीय शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फ्रान्सिस आशिष पिंटो असं या आरोपी शिपायाचे नाव आहे. डिसेंबर २०२४ पासून २४ मार्चपर्यंत या शिपायाने या मुलीचा लैंगिक छळ केला असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोलापूरातील नामांकित शाळेत ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, बदलापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर शाळेमध्येच लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. शाळेतील शिपायानेच हे घाणेरडे कृत्य केले होते. याप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. याप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपीचे पोलिसांनी एन्काऊंटर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT