Solpaur Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur: शिवा संघटनेच्या अध्यक्षाची हत्या, घरासमोरच गोळ्या झाडून संपवलं; सोलापूर हादरले

Solapur Crime: सोलापूरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. शिवा संघटनेच्या अध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Priya More

भरत नागणे, पंढरपूर

पंढरपूर शहरात मंगळवारी रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. शिवा संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजा भिंगे यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेल्या भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला. घरासमोरच भिंगे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर गोळीबाराची घटना घडल्याने संपूर्ण पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पंढरपूरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपासानंतरच गोळीबाराचे नेमके कारण समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इसबावी येथील उमा नगर परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ राजा भिंगे जेवणानंतर शतपावली करत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या २ हल्लेखोरांनी रात्री १० वाजताच्या सुमारास राजा भंगे यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोटात आणि पायाच्या दोन्ही बाजूला गोळी लागल्याने राजा भिंगे हे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पंढरपूर येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हॉस्पिटल बाहेर त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पूर्ववैमनस्यातून की अन्य कोणत्या कारणातून हा हल्ला झाला याचा तपास पोलिस करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे, पंढरपूर शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला ही पाचारण करण्यात आले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील 3 लाख शेतकरी 5 हजारांच्या अग्रिम मदतीपासून वंचित

Tounge Cleaning Tips: जीभ स्वच्छ कशी करायची?

Maharashtra Government: मोठी बातमी! आणखी एक महत्वाची योजना बंद, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Death : मृत्यूच्या क्षणी नेमकं काय जाणवतं? शरीर अन् मेंदूमध्ये होतात 'हे' ५ बदल

Bribe Case : पोलीस दलात खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं

SCROLL FOR NEXT