Solapur Malshiras Crime News Saam TV
महाराष्ट्र

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

Solapur Malshiras Crime News : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे.

Satish Daud

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. नातेपुते-फोंडशिरस रस्त्यावरील महादेव मंदिरजवळ शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नारायण विठ्ठल जाधव (वय ४२) आणि दुर्योधन नवनाथ निकम (वय २२) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही दहिगाव, चिकणे वस्ती येथील रहिवासी आहेत. या हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.

किरकोळ कारणातून ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नारायण जाधव याला दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली होती. या मारहाणाची जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन हे आरोपींकडे गेले होते.

यादरम्यान, त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला, की आरोपींनी नारायण आणि दुर्योधन याच्यावर दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले.

स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Pune Tourism : सहज-सोपा ट्रेक करायचाय? पुण्यातील 'हा' किल्ला उत्तम पर्याय

Shivani Naik : लगीन घटिका समीप आली! 'अप्पी' बांधणार लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्नगाठ, पाहा साखरपुड्याचे PHOTOS

Monday Lucky Zodiac: आठवड्याच्या पहिल्या दिवशी या राशी होणार मालामाल, तुमची रास कोणती?

Matheran Mini Train: पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून माथेरानची राणी पुन्हा धावणार

SCROLL FOR NEXT