solapur  Saam tv
महाराष्ट्र

Solapur Crime : पती कामानिमित्त परदेशी... महिला दुसऱ्याच्याचं प्रेमात, प्रियकराच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल...

प्रियकराकडून महिलेला सातत्याने त्रास दिला जात होता.

विश्वभूषण लिमये

Solapur Crime News : सोलापूर येथे प्रेमसंबंधातून एका महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पती कामानिमित्त बाहेरगावी असल्याने महिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. पुढे हे चूक असल्याचे तिला समजले आणि तिने आपला मार्ग बदलला. मात्र प्रियकराकडून महिलेला सातत्याने त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून महिलेने आपली जीवनयात्रा संपवली आहे. (Latest Solapur News)

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संदीप राठोड या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कविता प्रभाकर कल्यानम या महिलेने 4 मार्चला घरीच फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या आई सुनंदा चिक्का यांनी सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कविता कल्यानम यांचे पती तामिळनाडूमध्ये कामाला आहेत. त्यांना अकरा वर्षाचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे शेजारी राहणाऱ्या संदीप राठोडसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत नातेवाईकांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनी आपले प्रेमसंबंध तोडले होते. मात्र, प्रेमसंबंध तोडल्यानंतर संदीप राठोड हा सातत्याने कविता कल्यानम यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. त्यामुळे अखेर या सर्व त्रासाला कंटाळून कविता कल्यानम यांनी आत्महत्या केली. संदीप राठोड हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सातारा येथे देखील काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. जून्या प्रेम प्रकरणातून विवाहितेची हत्या करून एकाने स्वतः आत्महत्या कोली होती. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्नेहल वैभव माळी असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दत्तात्रय सुरेश माळी असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.जून्या प्रेमप्रकरणातून दत्तात्रय याने स्नेहलला संपविल्याने गावात खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर, प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रेत्यांना दणका; २ दिवसांत 32 आरोपी अटकेत

लग्न समारंभ आटोपून नवविवाहित जोडपं हेलिकॉप्टरनं निघालं अन् क्षणार्धात कोसळलं; नवरदेवाचा मृत्यू

डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी! पिंपळेश्वर मंदिरभूमीसाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर

Ladki Bahin Yojana: तब्बल1,25,00,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, नवी आकडेवारी आली समोर

विरोधी पक्षातील २ आमदार तडकाफडकी निलंबित; अचानक नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT