Solapur Crime SaamTv
महाराष्ट्र

Solapur Crime : संतापजनक! अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागापोटी पीडित अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धक्कादायक घटना

विश्वभूषण लिमये

Crime in Solapur : राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता राज्यातील सोलापूर येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

सोलापुरात (Solapur) एका अल्पवयीन मुलीवर दोघा नराधमांनी मिळून सामूहिक बलात्कार तर केलाच, परंतु त्याबद्दल पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरून पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला सुध्दा केला. हा संतापजनक प्रकार बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथे घडला आहे. यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अक्षय माने (वय २३) आणि नामदेव दळवी (वय २४) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीवर सत्तूर आणि कोयत्याने वार करत मुलीची दोन बोटं छाटल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी 6 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारासची घडली. पीडित तरुणी ही अल्पवयीन असून तिच्यावर 5 मार्च रोजी याच दोन्ही आरोपींनी अत्याचार केला होता. त्यावरून या दोन्ही आरोपी विरोधात बार्शी पोलिसात (Police) पोस्को कायद्याअंतर्गत अत्याचारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याच गुन्ह्याच्या तपास कामाच्या अनुषंगाने पीडित मुलीचे आई वडील हे संध्याकाळी पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा रात्री 8 च्या सुमारास आरोपी अक्षय आणि सिद्धेश्वर हे पीडितीचे घरी आले. हातात असलेल्या सत्तूर आणि कोयत्याने पीडित मुलीवर सपासप वार केले. यामुळे मुलीला डोक्यावर, कपाळाला इजा झाली.

धक्कादायक म्हणजे उजव्या हाताची दोन बोटं देखील तुटली. या हल्यानंतर पीडित मुलगी ही बेशुद्ध झाली, तिला बेशुद्ध अवस्थेतच बार्शीतल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या गंभीर प्रकारांनंतर आरोपी अक्षय आणि सिद्धेश्वर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

खड्डेमुक्त रस्त्यांची मंत्र्यांकडूनच पोलखोल, गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील रस्ते खराब'

Nashik Firing: नाशिकमध्ये गोळीबाराने खळबळ! पानटपरीसमोर उभ्या असलेल्या तरुणावर फायरिंग

जेन झी'चे अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड्स, बाबा रामदेव पुन्हा बरळले

SCROLL FOR NEXT