Solapur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Solapur News : धक्कादायक! ३ वर्षाच्या चिमुकलीला गळफास देत आईनेही संपवलं जीवन

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही दुर्देवी घटना घडली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील कोरवलीत तीन वर्षाच्या मुलीला फाशी देऊन स्वतः गळफास घेत एका महिलेने आत्महत्या (Crime) केली. प्रीती विजयकुमार माळगोंडे असे आई तर आरोही विजयकुमार माळगोंडे असे मृत लेकींची नावे आहेत. या धक्कादायक घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Solapur Crime News)

प्राप्त माहितीनुसार, प्रीतीचा पाच वर्षांपूर्वी कोरवली, येथील विजयकुमार माळगोंडे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर प्रीती आणि विजयकुमार हे दापत्य त्यांच्या शेतातील वस्तीवर राहत होते. त्यांना आरोही आणि बसवराज अशी दोन आपत्ये होती. त्यांचा सुखाचा संसार चाललेला असताना दीड वर्षापासून त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.

पती विजयकुमार हा पत्नी प्रीतीला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन मारहाण शिवीगाळ करू लागला. निराश झालेल्या प्रीतीने सततच्या त्रासाला कंटाळून मुलगी आरोही आणि मुलगा बसवराज यांना राहत्या घरी पत्र्याच्या लोखंडी अँगलला साडीने गळफास देऊन स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. (Solapur Todays News)

दरम्यान मुलगा बसवराज याला गळफास व्यवस्थित न बसल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी प्रीती यांचा भाऊ मल्लिनाथ राजशेखर मंगरूळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पती विजयकुमार हा माझ्या बहिणीस सतत शिवीगाळ मारहाण दमदाटी करीत होता. त्यामुळे माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. असं मंगरूळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

Avatar 3: हॉलिवूडचा 'अवतार ३' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू

SCROLL FOR NEXT