Solapur Water Issue:  Saamtv
महाराष्ट्र

Solapur News: विहिरींनी तळ गाठला, बोअरवेल आटले.. सोलापुरात पाणी टंचाईच्या झळा; दूषित पाण्यामुळे नागरिक हैराण

Solapur Water Crisis: यंदा पाऊस कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसत असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर|ता. २२ एप्रिल २०२४

मे महिना सुरू होण्यास अद्दाप अवकाश आहे, त्याआधीच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने सोलापूर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसत असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर (Solapur) जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली असून अनेक गावात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावाला आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. तसेच गावातील विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलही आटून गेल्यात त्यामुळे पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे.

शासनाकडून आठ दिवसातून एकदा पाणी येत असल्याने टँकरद्वारे आडात पाणी साठवले जात आहे. हेच साठवलेले पाणी काढताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु टँकरद्वारे दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, दुषित पाण्यामुळे आजारी पडण्याचा धोका असल्याचे गावकरी सांगत आहेत. त्यामुळे शासनाने पाण्यासाठी उपाययोजना करावी, दुषित पाणीपुरवठा टाळावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MBBS प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा, बोगस अॅडमिशनच्या रॅकेटचा पर्दाफाश

Operation Tiger : ऑपरेशन टायगरचा मुहूर्त ठरला? महाराष्ट्रातील २ नेत्यांनी थेट एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं, नेमकी वेळही सांगितली

राज्यात SC प्रवर्गात उपवर्गीकरण लागू? वसतिगृह प्रवेशाच्या जाहीरातीवरुन वाद

मॅगीच्या पाकिटात किडे? ब्रँडेड फूडचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

Maharashtra News Live Update: हिंगोलीतील पहेणी गावात चक्रीवादळ, लोकांच्या घरावरील पत्रे उडाले

SCROLL FOR NEXT