Maratha Reservation Protest Solapur:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar VIDEO: 'आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा', सोलापूरमध्ये शरद पवारांची गाडी रोखली; मराठा आंदोलक आक्रमक

Maratha Reservation Protest Solapur: आज सोलापूरमध्ये मराठा बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली.

विश्वभूषण लिमये

सोलापूर, ता. ११ ऑगस्ट २०२४

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोलापूरमध्ये मराठा बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणाबाबत आपली आणि पक्षाची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली.

सोलापूरमध्ये मराठा बांधव आक्रमक!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर असून बार्शीतील शरद शेतकरी संवाद मेळाव्याला ते हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाला जाताना टेंभुर्णी कुर्डुवाडी रस्त्यावर मराठा बांधवांनी शरद पवार यांच्या गाडीचा ताफा अडवून मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली.

शरद पवारांची गाडी अडवली

आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबत आपली आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवताच शरद पवार यांनी दरवाजा उघडून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे, असे आंदोलकांना सांगितले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शरद पवारांचा आज सोलापूर दौरा!

दरम्यान, शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. बार्शीमध्ये शरद शेतकरी संवाद मेळाव्याला ते हजेरी लावणार असून नवोदित खासदारांचा याठिकाणी सत्कारही होणार आहे. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार आदी नेते उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT