Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News : एटीएम फोडून २३ लाख लांबविले; बार्शी शहरात धाडसी चोरी

Solapur News : बार्शी शहरातील परांडा रोडवर स्टेट बँकेचे एटीएम आहे. चोरट्यानी हे एटीएम लक्ष केले असून शटर तोडून एटीएम मशीन फोडत यातील रक्कम लांबविली आहे

विश्वभुषण लिमये

सोलापूर : थंडीचे दिवस असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांसह कॉलन्यांमधील रात्री दहानंतर वर्दळ कमी झालेली आहे. याचा फायदा चोरटे घेत असून बार्शी शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम फोडून तब्बल २३ लाख रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सोलापूरच्या (Solapur News) बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावर हि घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बार्शी शहरातील परांडा रोडवर स्टेट बँकेचे एटीएम आहे. चोरट्यानी हे एटीएम लक्ष केले असून शटर तोडून एटीएम (ATM) मशीन फोडत यातील रक्कम लांबविली आहे. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत. 

२३ लाख लांबवीले 

बार्शी शहरात एटीएम फोडून धाडसी चोरी केली आहे. शहरातील परांडा रोडवरील एसबीआय एटीएम फोडून 23 लाख रुपयांची रक्कम लांबविली आहे. रविवारी पहाटेच्या चार वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून बँक एटीएमचे शटर तोडून चोरटयांनी आतमध्ये प्रवेश करत एटीएम फोडले. 

सीसीटीव्हीवर मारला स्प्रे 

चोरट्यानी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर ओळख पटू नये यासाठी सगळ्यात अगोदर एटीएमच्या कक्षातील सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारण्यात आला आला आहे. यामुळे या घटनेत चोरटे दिसून आलेले नाही. दरम्यान शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी घटना घडल्यामुळे बार्शी शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

एकनाथ शिंदेंनी लवकर शहाणे व्हावे, अन्यथा एका फटक्यात संपतील - जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT