Solapur News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : हृदयद्रावक! लाडक्या नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी आजीचाही मृत्यू, एकाचवेळी दोघांचे अंत्यसंस्कार, सोलापूरमध्ये हळहळ

Solapur News : अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात दुर्दैवी घटना. नातवाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारावेळी आजीनेही प्राण सोडले. आकस्मित निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात दुर्दैवी घटना घडली.

  • अपघातात आदित्य व्हनमाने या तरुणाचा मृत्यू झाला.

  • अंत्यसंस्कारावेळी धक्क्याने आजी जनाबाई यांचाही मृत्यू झाला.

  • दुहेरी अंत्यसंस्कारामुळे गावात हळहळ व शोककळा पसरली आहे.

आजी म्हणजे नातवंडांची दुसरी मैत्रीणच. मात्र याचं नात्याबद्दल मन पिळवटून टाकणारी घटना घडली आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात एकाच दिवशी नातवाचा अपघाती मृत्यू झाला. नातवाला निरोप देताना त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी आजीने प्राण सोडल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी एका घरात दोघांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हन्नूर गावातील भीमाशंकर माळप्पा व्हनमाने हे वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील आदित्य व्हनमाने, हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात नववीत शिकत होता. बुधवारी शाळा सुटल्यानंतर आदित्य घरी जाण्यासाठी एका दुचाकीस्वाराला गावाकडे सोडण्याची विनंती करत होता.

दुचाकीवर बसून तो निघाला होता, पण अचानक त्या गाडीतील पेट्रोल संपले. त्यानंतर दोघे पेट्रोल भरून पुन्हा निघाले असता समोरून आलेल्या एका कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर आदित्यचा जागीच मृत्यू झाला. आदित्यचा मृतदेह गावात आणल्यानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जेव्हा सर्व मंडळी जमली, तेव्हा आदित्यची आजी जनाबाई व्हनमाने यांनी हा प्रसंग पाहिला. आपल्या नातवाचा मृतदेह पाहून त्या असहाय झाल्या आणि जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एकाच दिवशी नातवाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याने हन्नूर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. हन्नूर स्मशानभूमीत नातवाचा आणि आजीचा अंत्यसंस्कार एकत्र करण्यात आला. एकाच दिवशी एका घरातील आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Over Sized Shirt Styling Tips: ओवरसाइज शर्ट स्टाइल करण्याच्या ७ सोप्या पद्धती प्रत्येक लूकमध्ये दिसाल अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics: फडणवीस आडनाव होतं म्हणून...; सदाभाऊ खोत स्पष्टच बोलले, VIDEO

Post Office Scheme : पोस्टाच्या PPF योजनेत वर्षाला गुंतवा फक्त ५०,००० रुपये अन् मिळवा भरपूर परतावा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: विद्यार्थ्यांकडून शिक्षकावर पुष्पवृष्टी करत आगळावेगळा निरोप

Blouse Sleeves Designs: ब्लाउज स्लीव्हजचे 'हे' फॅन्सी पॅटर्न नक्की ट्राय करा, साध्या साडीतही मिळेल ग्लॅमरस लूक

SCROLL FOR NEXT