Akkalkot News Saam tv
महाराष्ट्र

Akkalkot News : पुराच्या पाण्यातून दुचाकी काढणे जीवावर बेतले; बोरी नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून

Solapur News : सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यातच बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांना सतर्कतेचा इशारा

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील काही भागात दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी- नाल्याना पूर आला आहे. यात अक्कलकोट तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पुराच्या पाण्यात शेतात कामासाठी गेलेला एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान शोधकार्य सुरु असून अद्याप तपास लागलेला नाही. 

राज्यातील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात देखील मागील दोन- तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यातच अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाचा जोर आज देखील कायम असल्याचे पाहण्यास मिळाला. यामुळे बोरी नदीला पूर आला असून पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

पाण्यातून दुचाकी काढताना वाहिला 
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ते दुधनीला जोडणारा बोरी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यातच बोरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून शेतकरी दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना वाहून गेला आहे. बबलाद येथील रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती परिसरात समजताच ग्रामस्थांनी धाव घेतली. 

प्रशासनाकडून शोधकार्य सुरु 
दरम्यान घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. यानंतर अक्कलकोट तालुका प्रशासनाकडून रेवणसिद्ध बिराजदार याचा शोध घेण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. तर बोरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याने नदी काठच्या गावांना तालुका प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT