Paper Leak In Amravati Saam TV
महाराष्ट्र

Paper Leak In Amravati : एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी; अमरावती पेपरफुटी प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

Soil and Water Conservation Department Exam : अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला. कर्मचाऱ्यांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून दिली. या मध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांसह 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Ruchika Jadhav

अमर घटारे

Soil and Water Conservation Department Exam :

२१ फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी एकूण २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे अमरावतीत युवक काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत आंदोलन केलं आहे.

11 आरोपींना अटक

राज्यात ६७० पदासाठी मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. पण अमरावतीत या परीक्षेत गैरप्रकार झाला. कर्मचाऱ्यांनी पेपर फोडून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहून दिली. या मध्ये परीक्षा घेणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांसह 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी

या प्रकरणी एका जागेसाठी 25 लाख रुपयांची मागणी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. यात तब्बल 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थीसह युवक काँग्रेसने सरकार विरोधात घोषणाबाजी करत झालेली परीक्षा रद्द करण्याची मागणी केलीये.

झालेली परीक्षा रद्द करा आणि नव्याने परीक्षा घ्या तसेच या पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आनखी मोठे अधिकारी आणि नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे मोठे मासे पकडले पाहिजे अशी मागणी सुद्धा युवक काँग्रेसने यावेळी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोपी अशोक खरातचं घर तोडलं गेलं पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ₹६९,००० होणार? फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर|VIDEO

Mumbai crime : मुंबईत भररस्त्यात तरुणीला अमानुष मारहाण; दोघांनी लाथाबुक्क्यांनी तुडवले

Lalit Prabhakar: ललित प्रभाकर साकारणार 'ढसाळ'; दलित पँथरच्या नामदेव ढसाळांचे जीवनपट मोठ्या पडद्यावर

SCROLL FOR NEXT