Sanjay Raut
Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut's Allegations: गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांचा दबाव...; संजय राऊतांचा आरोप

Ruchika Jadhav

Political News: शिवसेना ठकरे गटाचे खासदार संजय राऊत कायमच त्यांच्या परखड वक्तव्यांनी चर्चेचा विषय ठरतात. सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर देखील राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Sanjay Raut News)

गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) याबाबत एक ट्वीट करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप केलेत. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी पोलिसांवर दबाव आणला, असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.

माझा गुन्हा काय?

"नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन" बेकायदेशीर ठरले आहे, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे

तसेच पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, " व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळेच घटना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील अशी स्थिती आहे.बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील. असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असं ठामपणे संजय राऊत म्हणालेत.

सरकार विरोधात काय म्हटले होते संजय राऊत

दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत म्हटलं की,"हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यांचा आदेश पाळू नका." संजय राऊतांना असं आवाहन केल्याने नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचा ५ जागांचा तिढा सुटला? पण नाशिकचा सस्पेन्स कायम

Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरेंचा उद्या श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Supriya Sule on Onion | कांदा निर्यातीवर सुळे यांचा केंद्र सरकारला सवाल

Vasant More Election symbol : झोप उडवणार! वसंत मोरेंना निवडणूक चिन्ह मिळताच विरोधकांना दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT