Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही... SaamTvNews
महाराष्ट्र

Snake Viral Video : ऑफिसमध्ये शिरला साप आणि झालं असं काही...

एप्रिल महिन्यात ११ तारखेला देखील हाच साप या ऑफिसमध्ये आढळला होता.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : विरार शहरातील एका प्रॉपर्टी डिलरच्या खाजगी ऑफिसमध्ये अचानकपणे साप शिरल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ऑफिसमध्ये शिरलेला हा साप बिनविषारी धामण असून हाच साप मागील एप्रिल महिन्यातील ११ तारखेला देखील याच ऑफिसमध्ये आढळून आला होता. मात्र, तब्बल एक महिना उलटून देखील धामण साप त्याच कार्यालयात थाट मांडून बसला होता.

संबंधित ऑफिसमध्ये लोकांची ये-जा असते. परंतु, हा साप कोणालाही दिसला नाही. या ऑफिसमध्ये एक मीटिंग चालू असताना हा साप अचानकपणे येथे बसलेल्या एका व्यक्तीच्या पायाजवळून गेला. पायाला काहीतरी स्पर्श झाल्याचे लक्ष्यात येताच सदर व्यक्तीने खाली पाहिले असता त्यास हा साप दिसून आला व त्यांनतर संपूर्ण ऑफिसमध्ये पळापळ झाल्याचे आपल्याला CCTV फुटेजच्या माध्यमातून समजून येईल.

साप ऑफिसमध्ये शिरत असल्याची संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. याबद्दल सदर ऑफिसमधून सर्पमित्रांना माहिती देण्यात आली. या सापाला ऑफिसमध्ये उपस्थित असलेल्या कोणीही कोणतीही इजा होऊ दिली नाही. सर्पमित्रांनी या सापास पकडून विरार मधिल तुंगारेश्वर जंगलात सोडले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता, अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT