Latur News दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

डॉक्टर हैराण! एकाच व्यक्तीला आतापर्यंत 500 पेक्षा जास्तवेळा सर्पदंश

अनिल तुकाराम गायकवाड असे या व्यक्तीचे नाव आहे. अनिल शेतमजूर म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो.

दीपक क्षीरसागर

लातूर - एका व्यक्तीला आतापर्यंत एक दोन वेळा नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त वेळा सापाने (Snake) चावा घेतला आहे. विशेष बाब म्हणजे गर्दी असतानाही साप त्यालाच चावून जातोय. त्यामुळे या व्यक्तीवर उपचार करणारे डॉक्टर (Doctor) देखील आता हैराण झाले आहेत. अनिल तुकाराम गायकवाड असे या व्यक्तीचे नाव आहे. अनिल शेतमजूर म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करतो. शेतात काम करताना अनेकदा सापाने चावा घेतला आहे.

हे देखील पहा -

शहरात अनेक माणसांच्या गर्दीत कार्यक्रमात असताना लोकांना नाही पण त्याला साप चावून जातो हे विशेष. गेल्या 10 ते 15 वर्षाच्या काळात 500 पेक्षा जास्तवेळा सापाने चावा घेतला आहे. अनेकदा प्रकृती खालावली की ICU मध्ये सुद्धा दाखल करावं लागलं डॉ सच्चिदानंद रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकवेळा उपचार घेतला आहे. स्वतः अनिल गायकवाड यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की इतरांना नाही पण त्यालाच गर्दीत असताना देखील साप का चावतो.

अनिल गायकवाड याच्यावर आजपर्यंत डॉ. सच्चिदानंद रणदिवे यांनी 150 पेक्षा जास्त वेळा उपचार केले आहेत. डॉ. रणदिवे औसा इथं ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून गेल्या पाच वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्याच्या नोकरीच्या काळात त्यांनी अनिल गायकवाड याच्यावर 150 पेक्षा वेळा उपचार केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Vs Lemon Water: नारळपाणी की लिंबूपाणी, उपवासाला कोणते ड्रिंक प्यावे?

Maharashtra News Live Update: काँग्रेस देशात अराजकता पसरवण्याचं काम करत आहे - फडणवीस

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा

Joint pain causes: सांधे दुखत असतील तर सावध व्हा! वाढतं वयच नाही, तर ही कारणंही ठरू शकतात सांधेदुखीला जबाबदार

Seasonal Fruits : कोणत्या हंगामात कोणती फळे खावी? ९९% लोक करतात 'ही' १ चूक

SCROLL FOR NEXT