Sangli Saam TV
महाराष्ट्र

Sangli : कत्तलीसाठी नेणाऱ्या ४१ गोवंशाची सुटका; ४२ लाखांहून अधिक मुद्देमाल इस्लामपूर पोलिसांकडून जप्त

Sangli News : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई वाळवा तालुक्यातील पेठनाका परिसरात करण्यात आली. यामध्ये दोन टेम्पोसह गोवंश असा ४२ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

Ruchika Jadhav

विजय पाटील

Smuggling of Animals :

गोवंश कत्तल करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील काही ठिकाणी अवैधरित्या कत्तल केली जाते. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. मात्र तरी देखील राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गोवंश कत्तलीच्या घटना उघडकीस येत आहेत.

सांगलीमध्ये देखील अशीच एक घटना उघडकीस आलीये. कत्तल करण्याच्या उद्देशाने टेम्पोतून नेण्यात येणाऱ्या तब्बल ४१ जनावरांची सुटका करण्यात इस्लामपूर पोलीसाच्या पथकाला यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाच्या मदतीने ही कारवाई वाळवा तालुक्यातील पेठनाका परिसरात करण्यात आली. यामध्ये दोन टेम्पोसह गोवंश असा ४२ लाख १० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सचिन निवास साळुंखे (रा. पेठनाका), सचिन विनोद वारे (रा. आष्टा), उमेश उर्फ राजू बापूसाहेब धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. शिराळा) आणि दिलीप महादेव गायकवाड (रा. शिराळा) यांना ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत.

पेठनाका परिसरात गस्त घालत असताना दयानंद अकॅडमीसमोर एका ठिकाणी गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवली होती. त्यांची टेम्पोतून वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. त्यावेळी एका शेडमध्ये व टेम्पोमध्ये 3 दाटीवाटीने ३४ जनावरे बांधल्याचे निदर्शनास आले. तसेच इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतच गोवंश वाहतूक करणारा टेम्पो गुन्हे अन्वेषणच्या दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतला.

नाशिकच्या येवला शहरातील नांदेसर परिसरात देखील गेल्या महिन्यात अशीच कारवाई करण्यात आली होती. कोपरगाव येथून येवल्यात अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश जातीची जनावरे घेऊन येत असलेल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर गोरक्षक व पोलिसांनी नांदेसर रेल्वे गेट जवळ गाडी पकडली. सकाळच्या समारास ही घटना घडली असून पकडलेल्या गाडीतून सात जनावरांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT