Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

पीपीई किटमुळे कोरोनाबधितांच्या मृतदेहाचं संथ विघटन; महामारीनंतरचं धक्कादायक वास्तव

सामान्यतः मृतदेहाचं विघटन होण्यासाठी 14 ते 18 महिने लागतात मात्र पीपीई किटमुळे 2 वर्षांनंतरही मृतदेहाचे विघटन होईना

अभिजीत सोनावणे

नाशिक - कोरोनानंतरही या महामारीचे दुष्परिणाम अद्यापही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे (Corona) मृत झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांवर प्लॅस्टिकचं आच्छादन आणि पीपीई किट लावल्यामुळे दफनविधीनंतर तब्बल 2 वर्षांनंतरही मृतदेहाचं पूर्णपणे विघटन होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पीपीई किटमुळे विघटन संथ गतीने होत असल्यानं 2 वर्षांनंतरही मृतदेहांच पूर्णपणे विघटन न झाल्यानं नाशिकच्या (Nashik) कब्रस्तानात दफनविधीसाठी जागाचं शिल्लक नसल्यानं नव्या दफनविधीसाठी जागा आणायची कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील पहा -

नाशिकमध्ये मुस्लिम समाजाचे 4 कब्रस्तान असून कोरोना काळात जुन्या नाशिकमधील कब्रस्तानात दिवसाला 15 ते 16 मृतदेह दफनविधीसाठी येत होते. सर्व सामान्यपणे मृतदेहाचं पूर्णपणे विघटन होण्यासाठी 14 ते 18 महिने लागतात. त्यामुळे नव्या दफनविधीसाठी जागेची अडचण आल्यानंतर साधारणपणे 2 वर्षांनंतर कबरी पुन्हा उघडल्या जातात. मात्र पीपीई किटमुळे विघटन संथ गतीने होत असल्यानं 2 वर्षांनंतर या कबरी उघडल्यानंतर कबरीतील प्लॅस्टिक मृतदेहाचे अंश दिसत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या ठिकाणी निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नव्या जागेचा शोध घेण्याची वेळ कब्रस्तानच्या विश्वस्तांवर आली आहे.

मृतदेहाच्या विघटनाची प्रक्रिया काही तासात सुरू होते. सामान्यतः जमीन, वातावरण आणि तापमानावर विघटनाची प्रक्रिया अवलंबून असते. मात्र 14 ते 18 महिन्यात मृतदेहावरील संपूर्ण मांसाचं विघटन होऊन हाडांचा सांगाडा शिल्लक राहतो. हाडांच्या सांगाड्याचं पूर्ण विघटन होण्यासाठी अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT