Accident Saam tv
महाराष्ट्र

Breaking : सोलापूर मध्ये भीषण अपघात; दोन कारच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू, तीन जखमी

पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सोलापूर : येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक (Car Accident) झाल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू (six people death) झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये मोहोळ येथील रहिवासी असलेल्या खान कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले असून अपघातातील जखमी व्यक्तींना सोलापूरच्या रुग्णायलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ-पंढरपूर महामार्गावर पेनूर येथील माळी पाटीजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. ही दुर्देवी घटना मोहोळ-पंढरपूर महामार्गावर घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, मोहोळ येथील खान कुटुंबातील सदस्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच जखमींनाही पुढील उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या गंभीर घटनेमुळं संपूर्ण परिसर शोकाकुळ झालं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel :...तर तुम्हाला पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी, शिवाजी पार्कवर उद्धव यांच्यासह राजही दिसणार?

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सर न होण्यासाठी कोणते पदार्थ टाळावे?

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

SCROLL FOR NEXT