Murder Saam Tv
महाराष्ट्र

Crime : मेव्हण्यानं दगडाने ठेचून केली दाजींची हत्या; वाचा का उचललं टोकाच पाऊल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कराड : कराडमध्ये Karad शुक्रवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या बहिणीला तिचा नवरा सतत त्रास देतो तसेच दारु पिल्यावरती मारहान करतो या कारणावरुन आधीच दाजीबद्दल मनात राग असलेल्या मेव्हण्याने, दाजीने बहिणीला काल रात्री आणखी मारहाण केल्याने रागवलेल्या मेव्हण्याने आपल्याच दाजीचा खून केला आहे.

हे देखील पहा -

नितीन नागेश भालशंकर रा. वाखाण कराड. Wakhan Karad मुळगांव बार्शी, जि. सोलापूर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मयत व्यक्तीच्या मेव्हण्याचे नाव रवी रमेश कुडवे असे असून तो देखील वाखाण परिसरातच राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड येथील वाखाणात नितीन भालशंकर आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. तो सतत दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करत असायचा आणि याच कारणाचा राग मनात ठेवून नितीन याच्या मेव्हण्याने आपल्या दाजीचा गळा दाबून छातीवर दगडे मारुण मारुण हत्या केली आहे. सदरची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक B.R पाटील (Police inspector) यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT