Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: दादा लग्नाला येऊ नको! जातपंचायतीच्या दहशतीला घाबरून बहिणीचं भावाला भावनिक पत्र

जातपंचायतच्या दहशतीमुळे बहिणीने भावाला दुखःद अंतकरणाने चिठ्ठी लिहून लग्नाला येवू नये, असं आवाहन केलं.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कुटूंबाला ( वैदू ) जातपंचायतने वाळीत टाकल्याने आज होणाऱ्या भाच्याच्या लग्नाला मामाला जाता जाता आले नाही. जातपंचायतच्या दहशतीमुळे बहिणीने भावाला दुखःद अंतकरणाने चिठ्ठी लिहून लग्नाला येवू नये, असं आवाहन केलं. त्यामुळे जातपंचायतीचा जाच अजूनही सुरू असल्याची बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे ( वैदू समाजातील ) सुशिक्षित डॉ. चंदन लोखंडे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील अनिष्ठ परंपरा विरोधात लढा देत आहेत. त्यामुळेच की काय जातपंचायतीच्या पंचांनी त्यांच्या कुटुंबावरच अघोषित बहिष्कार टाकला आहे.

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून लोखंडे यांच्या कुटुंबीयांना कोणीही सुख दुखःच्या वेळी बोलावत नाही की त्यांच्याकडेही कोण जात येत नाही. चंदन लोखंडे यांच्या भाच्याचा आज विवाह पार पडला. मात्र बहिणीने मुलाकरवी अगोदरच पत्र लिहून भावाला लग्नाला न येण्याचं आवाहन केलं.

कारण जर लग्नाला हे लोक गेले तर लग्न मोडेल आणि १२ लाख रूपये दंडही द्यावा लागणार आहे. जातपंचायतीने अघोषित बहिष्कार टाकल्याने कुटुंबातील मुलांची लग्न जमवणे कठीण झालं आहे.

डॉ. चंदन लोखंडे सामाजातील अनिष्ठ प्रथा परंपरा विरोधात लढा देत असल्याने आमच्यावर अघोषित बहिष्कार टाकण्यात आला आहे. आम्ही प्रचंड प्रचंड दहशतीखाली जगत असल्याचे लोखंडे कुटुंबीय सांगत आहे.

पाच सात वर्षांपूर्वी जात पंचायती बंद झालेल्या असतानाही अघोषितपणे त्या आजही अस्तित्वात असल्याचे लोखंडे यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. वैदू समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष कृष्णा शिंदे यांनी देखील या घटनेचा निषेध केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

आज जग एकविसव्या शतकात वाटचाल करत असताना काही समाज अजूनही आपल्या अनिष्ठ परंपरा सोडताना दिसत नाही. अशा समाजांनी रूढी परंपरांना तीलांजली देण्याची आणि अघोषित जातपंचायती हद्दपार करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT