Chhatrapati Sambhaji Nagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime News: पत्नीसोबत सासुरवाडीला आला अन् मेहुणीला घेऊन पळाला; नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: पत्नीसोबत सासुरवाडीला आलेल्या एका नराधम तरुणाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला प्रेमाची फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीसोबत सासुरवाडीला आलेल्या एका नराधम तरुणाने आपल्या अल्पवयीन मेहुणीला प्रेमाची फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

कन्नड ग्रामीण (Kannad News) पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कन्नड ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील २० वर्षीय तरुणाचा ३ वर्षांपासून विवाह झाला होता. तो अधूनमधून सासुरवाडीला येत असे. याच दरम्यान आपल्या पत्नीच्या अल्पवयीन बहिणीसोबत जवळीक साधू लागला.

काही दिवस ऊसतोडणीला गेल्यानंतर आरोपी हा पत्नीसोबत (Crime News) सासुरवाडीला आला. दरम्यान, आरोपीने अल्पवयीन मेहुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. २२ मे रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने आरोपी पीडितेस तिच्या भावासह बाजार करण्यासाठी कन्नड येथे घेऊन आला.

आपल्या मेहुण्याला दुसरीकडे पाठवून नराधम भाऊजीने मेहुणीला प्रेमाची फूस लावून दुचाकीने सातारा येथे पळवून नेलं. सातारा जिल्ह्यातील मयनी (धोंडेवाडी) येथे गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मेहुणीवर वारंवार बलात्कार केला. २ जुलैला आरोपी पीडितेला कन्नड तालुक्यातील गावी घेऊन आला.

दरम्यान, नातेवाईकांना याप्रकरणी माहिती मिळताच त्यांनी तातडीने आरोपी व पीडितेस कन्नड ग्रामीण पोलिसांच्या (Police) स्वाधीन केले. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. भाऊजीनेच आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT