Sindhudurg ST bus crash at Panhval Saam tv news
महाराष्ट्र

Sindhudurg: भीषण अपघातात दोन्ही ST बसचा चुराडा, समोरासमोर धडक अन् १०० फुटापर्यंत फरपटत नेलं

Sindhudurg ST bus crash: सिंधुदुर्गातील पानवळ येथे दोन एसटी बसच्या समोरासमोर धडकेने भीषण अपघात घडला. जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून, अपघाताचा तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

सिंधुदुर्गात दोन एसटी बसचा समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात घडला. हा अपघात बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे घडला. या अपघातात दोन्ही बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती, तर समोरून भरधाव उस्मानाबादहून पणजीच्या दिशेने येत होती. पानवळ येथील वळणावर समोरून येणारी बस दिसल्यामुळे, फुकेरी बसचा चालक ब्रेक मारण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, दुसऱ्या एसटी बसने फुकेरी बसला १०० फूट फरपटत नेले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे बसच्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बांदा फुकेरी बस फुकेरीतून बांद्याच्या दिशेने येत होती. तर, दुसरी एसटी बस उस्मानाबादहून पणजीच्या दिशेनं येत होती. पानवळ येथे वळण आलं. समोरून एसटी बस येत असल्याकारणाने बस चालकाने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्या एसटी बसने फुकेरी बसला १०० फूट फरपटत नेले.

या अपघातामध्ये फुकेरी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. या भीषण अपघातामुळे एसटी बसमधील प्रवासी भयभीत झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच प्रवासी जखमींना तातडीने बसच्या बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

दोन बसच्या समोरासमोर धडक बसल्यानं काहीकाळ पानवळ येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. तसेच स्थानिकांनी देखील अपघाताच्या परिसरात गर्दी केली. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून, हा अपघात नेमका कसा घडला? याचा तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT