Sindhudurg Earthquake Saam TV
महाराष्ट्र

Sindhudurg Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने सिंधुदुर्ग हादरले, घरांच्या भिंतींना तडे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पाहा VIDEO

Kankavali Earthquake Update: सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक जमीन हादरल्यामुळे सर्वजण घाबरले आणि घराबाहेर पळाले.

Priya More
  • सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यात भूकंपाचे धक्के

  • फोंडाघाट आणि विद्यानगर-बेलदारवाडी परिसर सर्वाधिक प्रभावित

  • चार घरांचे नुकसान झाले असून भिंतींना तडे गेले

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

विनायक वंजारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भूकंप सदृश धक्के जाणवले त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवळी, फोंडाघाट, विद्यानगर-बेलदारवाडी या परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. या घटनेमध्ये परिसरातील चार घरांचे मोठे नुकसान झाले. घरांच्या भिंतींना मोठ मोठ्या भेगा पडल्या, अशी माहिती येथील सरपंच संजना आंग्रे यांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी बुधवारी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे संजना आग्रे यांनी सांगितले. पण या भूकंपाचे धक्के किती रिश्टर स्केल तीव्रतेचे होते याची माहिती समोर आली नाही. या भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. कधी मुसळधार तर कधी रिमझिम स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. मात्र पहिल्याच पावसात महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार वाहचालकांना त्रासदायक ठरत आहे. मुंबई- गोवा महामार्गांवर जाणवली येथील एका कॉजवेवर पाणी साचलेय. त्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर पाणी साचल्याने त्याचं पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करणार- मुख्यमंत्री

Weight loss plan: 1 महिन्यात कमी करा 5 ते 7 किलो वजन कमी; तज्ज्ञांनी सांगितला सोपा डाएट आणि फिटनेस प्लॅन

Sex Racket Bust : स्पा सेंटरच्या आडून सुरु होती देह विक्री, ६ महिला आणि २ पुरुष नको त्या अवस्थेत; पोलिसांनी दार उघडलं अन्...

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT