nitesh rane
nitesh rane 
महाराष्ट्र

राणेंचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला; आजच्या घडामाेडींवर लक्ष (VDO)

साम न्यूज नेटवर्क

सिंधूदूर्ग : आमदार नितेश राणेंच्या (nitesh rane latest news) यांच्या अटकपुर्व जामीनावर आज (बुधवारी) सिंधूदूर्ग (sindhudurg) न्यायालयात सुनावणी हाेणार आहे. ही सुनावणी दुपारच्या सत्रात हाेईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी (ता. २८) सरकार पक्षाचा युक्तीवाद पुर्ण हाेऊ शकला नाही. आज उर्वरित युक्तीवाद केला जाईल.

दरम्यान न्यायालयाने राणेंच्या अंतरिम जामीनाची मागणी फेटाळून लावल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी मंगळवारी दिली. त्यामुळे राणेंना मंगळवारी तरी दिलासा मिळाला नव्हता. आज (बुधवार) न्यायालयीन प्रक्रियेकडे राज्यातील राजकीय क्षेत्राबराेबरच नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील (sindhudurg dcc bank election) प्रचार प्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (santosh parab) हल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (nitesh rane) यांचा अटकपुर्व जामीन अर्जावर आज (बुधवार) पुन्हा न्यायालयात (pre-arrest anticipatory bail) सुनावणी हाेणार आहे. मंगळवारी राणेंच्या वकीलांचा युक्तीवाद पुर्ण झाल्यानंतर सरकार पक्षाच्यावतीने युक्तीवादास प्रारंभ झाला. सरकार पक्षास सखाेल मुद्दे मांडायचे हाेते. त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही.हांडे यांच्याकडे सरकार पक्षाने वेळ मागतिला. त्यानूसार आज पुन्हा सुनावणी हाेत आहे.

दरम्यान राणे हे गाेव्यात (goa) गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या तपासासाठी पाेलिसांचे पथक गाेव्याला गेले आहे. परंतु पाेलिसांना राणे सापडू शकलेले नाहीत. आजच्या दुपारच्या सुनावणीवर सा-या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KL Rahul: संजीव गोयंका अन् केएल राहुलच्या भेटीचा तो फोटो व्हायरल! भेटीत नेमकं काय घडलं?

Asmita Deshmukh : देवमाणूसमधील डिंपल सध्या काय करतेय?

Sonakshi Sinha: सोनाक्षीचा सुंदर साज; सोज्वळ अदांवर भाळले चाहते!

Delhi Fire News: दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशामक दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल

Evening Snack Recipe: टी टाईमला बनवा खास; सोप्या पद्धतीनं बनवा कर्नाटक स्पेशल निप्पट्टू

SCROLL FOR NEXT