Sindhudurg Latest Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sindhudurg News : भयंकर! सासरच्या लोकांनी जावयाला विजेचा शॉक देऊन मारलं; धक्कादायक घटनेनं कोकणात खळबळ

Sindhudurg Latest Crime News : सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली.

Satish Daud

विनायक वंजारे, साम टीव्ही

सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कोकणात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय. वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, वसंत उर्फ सागर हा कुडाळ तालुक्यातील (Sindhudurg News) माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. मंगळवारी त्याचा मृतदेह सासरवाड येथील एका नर्सरीत आढळून आला. आपल्या भावाची त्याच्या सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन हत्या केली असा आरोप मृत वसंत भगे याच्या भावाने केला.

यासंदर्भात त्याने पोलिसात (Police) तक्रार देखील दाखल केली. वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत भगे याला त्याची पत्नी नुतन शंकर गावडे हिने सोमवारी रात्रीच्या सुमारास आडेली सातेरी गाळू येथे राहत्या घराजवळ बोलावून घेतले.

संशयित आरोपींनी वसंतला मारण्यासाठी त्यांच्या घराच्या कंपाऊंड भोवती विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले. वसंत हा पत्नीच्या बोलवण्यावरून सासुरवाडीला गेला असता, त्याचा स्पर्श या विद्युत तारांना झाला. यामुळे शॉक लागून वसंतचा मृत्यू झाला.

दरम्यान, वसंत आणि त्याची पत्नी नुतन यांच्यात नेहमी वाद व्हायचे याच वादातून ही हत्या केली असावी, असा संशय मृत तरुणाच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंत भगे याची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान मोदी म्हणाले सोनं खरेदी करू नका, राहुल गांधी भडकले; म्हणाले आता देश चालवणे...

Hair Care: टोमॅटोच्या रसाने केस पुन्हा उगवू शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Maharashtra News Live Update: चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णणावर नागरिक संतप्त, शिंदेसेनेचा आंदोलनाचा इशारा

Methi Ladoo Recipe: कडवटपणा निघून जाईल! मेथीच्या लाडूची ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील लहान मुलेही मागून खातील

Private railway station: ना टॅक्सी...ना कार..नवाबासाठी ट्रेन थेट राजवाड्यात यायची! या रेल्वे स्टेशनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT