Sindhudurg News Saam tv
महाराष्ट्र

Sindhudurg : मालवण समुद्रात मासेमारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, दोघे बचावले

Sindhudurg News : मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली

Rajesh Sonwane

विनायक वंजारे 

सिंधुदुर्ग : मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांची नौका पलटी होऊन बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक मच्छिमार बेपत्ता झाला असून दोघेजण थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचा शोध घेण्याचे कार्य स्थानिक मच्छिमारांकडून सुरु आहे. मात्र अद्याप शोध लागलेला नाही. 

सिंधुदुर्गच्या मालवण समुद्रात मासेमारी करण्यासाठी काही मच्छिमार छोटी नौका घेऊन गेले होते. मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. यात मेढा जोशीवाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी, सचिन सुभाष केळुसकर, जितेश विजय वाघ हे तीन मच्छीमार होते. 

दोघे बचावले, एकजण बेपत्ता 

समुद्रात गेल्यानंतर जोरदार वारा सुरु झाला. वारा आणि उसळलेल्या लाटांच्या माऱ्यात ही नौका पलटी झाली. नौकेत असलेल्या तीन मच्छीमार पाण्यात फेकले गेले होते. लाटांमध्ये बाहेर निघणे अवघड जात होते. नौका पलटी हल्याने यापैकी जितेश वाघ हा बेपत्ता आहे. तर अन्य दोघांना सुखरूप बाहेर निघण्यास यश मिळाल्याने ते बचावले आहेत. दोघांनीही घटनेची माहिती वस्तीत दिली. यानंतर अन्य मच्छिमार घटनास्थळी दाखल झाले. 

मच्छिमारांकडून शोधकार्य सुरु 

दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक मच्छिमारांकडून बेपत्ता झालेला जितेश वाघ याचा समुद्रात शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. अद्याप जितेश याचा तपास लागलेला नसून शोधकार्य सुरूच आहे. तर अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

Nutmeg Milk: रात्री झोप येत नसेल तर? दुधात मिसळा स्वयंपाकघरातील हा पदार्थ

Mumbai : ९ जुलैला भारत बंद! मुंबईत शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार? काय सुरु असणार?

Viral Video: चक्क पोलिसांकडून चोरी! जनरल डब्यातील झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल लंपास केला, VIDEO व्हायरल

Nagpur News : नागपूरच्या १२ वर्षीय जयेशचा मृत्यू नेमका कसा झाला? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT