सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर; नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला अनंत पाताडे
महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर; नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला

भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग - जिल्हा बँकेची निवडणूक (Election) जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानुसार आजपासून म्हणजे २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. सिंधुदुर्गातील राजकारणाच्या दृष्टीने तसेच भाजप आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.

हे देखील पहा -

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकरिता ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे महत्त्वाचे असणारे आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचा सामना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील ३ पक्ष या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रणनीती आखली जात आहे.

त्यामुळे नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे राणा यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिला जात आहे मात्र वारंवार निवडणूक लांबणीवर पडत असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला ताणलेली असतानाच आता अखेर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eyebrow Tips : १ हफ्त्यात पातळ आयब्रो करा घनदाट आणि जाड ; घरच्या घरी बनवा हे सीरम

Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील दरोड्याचे बीड कनेक्शन उघड; पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update: अशोक खरातच्या जामिनाला सरकारचा विरोध; ६ लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची सेशन्स कोर्टात सुनावणी

Aadhaar Email Update : आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 'ही' सेवा 31 डिसेंबरपर्यंत फ्री, आताच करून घ्या नाहीतर...

SCROLL FOR NEXT