SINDHUDURG TO NAVI MUMBAI FLIGHT SERVICE saam tv
महाराष्ट्र

सरकारकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट! सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू; पहिलं उड्डाण कधी? तिकिटाचे दर अन् वेळापत्रक पाहा

Sindhudurg To Navi Mumbai Flight Service: कोकणवासीयांसाठी मोठी आनंदाची बातमी! सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावरून नवी मुंबईसाठी १६ नोव्हेंबरपासून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे.

Omkar Sonawane, Ganesh Kavade

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ ते नवी मुंबईदरम्यान विमानसेवा सुरू होणार असून, या विमानसेवेच्या तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी या मार्गावरील पहिल्या विमानाचे उड्डाण होणार आहे. विशेष म्हणजे, आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. या विमानसेवेचे संचालन Fly91 या विमान कंपनीकडून केले जाणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशाशी कोकणची हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या 'X' या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत विमानसेवेची माहिती दिली. 'येवा, कोकण आपलोच आसा!' असे म्हणत त्यांनी प्रवासी आणि पर्यटकांना या विमानसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनेही ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषतः कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ होणार असून, स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, नवी मुंबई विमानतळावरून सकाळी 7.55 वाजता हे विमान उड्डाण करेल आणि सकाळी 9.05 वाजता सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर चिपी विमानतळाववरून सकाळी 9.25 वाजता हेच विमान नवी मुंबईकडे उड्डाण करेल. सकाळी 10.35 वाजता हे विमान नवी मुंबई विमानतळावर लँड होईल. अवघ्या एक तासात आता मुंबई ते कोकण हा प्रवास होणार आहे.

तिकिटाचे दर किती असतील?

या विमान प्रवासाचे बुकिंग सुरू झाले असून मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिलीय. Fly 91 या विमान कंपनीकडून ही विमान सेवा करणीय येईल. त्यानुसार नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या विमानसेवेचे तिकीट दर 3500 रुपयांपासून ते 12000 रुपयांपर्यंत असणार आहे. राणे यांनी तिकीटाच्या दारांचा स्क्रीनशॉट देखील एक्सवर शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये एफडीएची मोठी कारवाई, श्री बालाजी लाडू सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा

Dhanteras Horoscope 2026: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या मेष ते मीन राशींचं भविष्य

दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

पोटातून गुडगुड आवाज का येतो?

IPL आधीच २ संघांमध्ये मोठा उलटफेर; ४ खेळाडूंची अदलाबदल होणार, कोण आहेत ते क्रिकेटपटू?

SCROLL FOR NEXT