सरपंच बाईंना उपचारासाठी नेले डोलीतून राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

गावाला रस्ताच नसल्याने सरपंच बाईंना उपचारासाठी नेले डोलीतून; गावकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात संताप

अतिवृष्टीमुळे गावातील संपर्काचे दोन्ही पूल तुटले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर -

रायगड : महाड तालुक्यातील रायगड Raigad किल्याच्या पायथ्याशी असलेले दुर्गम भागात असलेले बावले Bawale या गावाचा 22 जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील संपर्काचे दोन्ही पूल तुटले आहेत अशातच अनेक वर्षापासून गावात रस्त्याची वानवा आहे. तुटलेल्या पुलाचे कामही केले नसल्याने आणि गावात रस्ताच नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ताच नसल्याने गावात आजारी पडलेल्या रुग्णाला डोलीच्या मदतीने पायपीट करून रुग्णालयात घेऊन जावे लागत आहे. (Since there is no road to the village, the sarpanch was taken for treatment via doli)

हे देखील पहा -

आज बावले गावच्या सरपंच सुनीता महाडिक Sunita Mahadik यांनाच या बाका प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. सुनीता या आजारी पडल्याने ग्रामस्थांनी त्यांना डोलीत टाकून पाचाड येथे तीन किलोमीटर पायपीट करून आणले आणि त्यानंतर वाहनाने महाड उपजिल्हा रुग्णालयात Mahad Sub-District Hospital दाखल केले. बावले ग्रामस्थांना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्या दुर्लक्षपणामुळे या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आमची ही अडचण लवकरात लवकर सोडवा अशी मागणी बावले ग्रामस्थ करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागात आजही रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्यातच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक गावाचा रस्त्यामुळे आजही संपर्क तुटलेला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडूनही पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बावले गावचा रस्ताही गेली अनेक वर्षे खडतर आहे. गावात रस्ताच नसल्याने आणि अतिवृष्टीत In Heavy Rain पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचा संपर्क हा तुटलेला आहे. रात्री अपरात्री गावातील व्यक्ती आजारी पडल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र बावले गावाच्या या समस्येकडे कोणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT