Shri Nagnath Yatra News | Bagad News saam tv
महाराष्ट्र

Bagad: नागनाथ देवाच्या यात्रेतील लाकडी बगाड पळविण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

या बगाडाला सुमारे दोनशे वर्षांची परंपरा आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत श्री नागनाथ देवाच्या यात्रेतील (shri nagnath yatra) खास वैशिष्ट्य असलेली लाकडी बगाड (bagad) पळविण्याचा कार्यक्रम रविवारी उत्साहात संपन्न झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लावण्यात आलेले निर्बंध उठवल्यानंतर बगाड पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (bagad latest marathi news)

खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील ग्रामदैवत नागनाथ देवाच्या यात्रे निमित्त गुडीपाढव्यापासून (gudi padva) ह्या यात्रेस प्रारंभ हाेताे. ही यात्रा चार दिवस चालते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे लाकडी बगाड पळविण्याच्या कार्यक्रम. यामध्ये एकूण सात बगाड असून बैलाच्या सहाय्याने बगाड पळविण्यात येतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतात.

हे बगाड पूर्णपणे लाकडी असून केवळ त्याची दोन चाके दगडी असतात. बगाड बांधणी करताना दोरीला कोठेही गाठ दिली जात. या बगडाचे मानकरी हे बारा बलुतेदार असून प्रत्येक समाजाला वेगवेगळा मान आहे. यादव समाजाचा मान बगाड बांधणीचा आहे तर तेली समाजाचा मान हा बगाडाला वंगण घालण्याचा. सर्व जाती धर्माचे लोक आणि भाविक भक्तिभावाने या नागनाथ यात्रेस येतात. बागड पाहण्यासाठी सांगली, कोल्हापूर , सातारासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर राज्यातील भाविकांनी गर्दी केली हाेती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT