एकाच रात्री पाच दुकाने फोडली; परळी तालुक्यातील धक्कादायक प्रकार विनोद जिरे
महाराष्ट्र

एकाच रात्री पाच दुकाने फोडली; परळी तालुक्यातील धक्कादायक प्रकार

जिल्ह्यात चोरीचे प्रमाण वाढल्याने भीतीचे वातावरण...

विनोद जिरे

बीड - बीडच्या Beed परळी Parali तालुक्यात असणाऱ्या सिरसाळा गावात एकाच रात्री 5 दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. गावातील चांद नगर परिसरात मध्यरात्री कापड दुकान, भांड्याची दुकान , खताची दुकान, यासह होलसेल किराणा दुकान असे पाच दुकाने एकाच रात्री शटर फोडून, लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्या विरुध्द कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

हे देखील पहा -

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील चांद नगर परिसरात, मध्यरात्री २:०० वा.च्या सुमारास पाच दुकाने चोरांनी फोडून कपड्यासह किराणा , खते, भांडे चोरून नेल्याने खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिरसाळा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. मात्र चोरीचे प्रमाण वाढल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT