Shocking News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News : लातूरमध्ये पाणीपुरीच्या पाण्यात आढळल्या जिवंत अळ्या; Video पाहूनच अनेकांना आल्या उलट्या, खवय्यांमध्ये खळबळ

Shocking News : पाणीपुरी खाणाऱ्यांच्या प्रत्येकासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यात पाणीपुरीसोबत देण्यात येणाऱ्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणीपुरीच नाव जरी घेतल तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.त्यातही जर तुम्ही चटकदार आणि खंमंग पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाला एकदा जाऊन पाणीपुरी खाऊ असं होत. मात्र सोशल मीडियावर पाणीपुरी खाणाऱ्या खवय्यांसाठी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात पाणीपुरीसोबत आपल्याला देण्यात येणाऱ्या पाण्यात चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याचा लातूरचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाणीपुरीच्या पाण्यात आढळून अळ्या(larvae) असल्याचा व्हिडिओ अनेकांना फेक असल्याचे वाटेल मात्र हा सर्व प्रकार लातूरमधून खरा असल्याचे समोर आले आहे. लातूर शहरातील गांधी चौकातील एक नामांकित स्वीट होममधील हा प्रकार आहे,जो एका ग्राहकाने उघडकीस आणला आहे.

ग्राहकाला हा प्रकार दिसताच त्याने मोबाईलमध्ये (mobile)सर्व कैद केला आहे.. पाणीपुरी सोबत देण्यात येणाऱ्या पाण्यात जिवंत आळी निघाल्याने शहरातील खवय्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.तर हा व्हिडिओ सध्या लातूरमध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.मात्र अद्याप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या पाणीपुरी विक्रेत्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही.

व्हिडिओत काय?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ लातूरमधील एका स्वीट होमधील आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला पाणीपुरी सोबत देण्यात येणारे पाणीपुरीचे पाणी एका भांड्यात दिसून येत आहे. तुम्ही या भांड्यात असलेल्या पाणीपुरीच्या पाण्यात नीट पाहिले तर एक अळी दिसून येत आहे. धक्कादायक म्हणजे ही अळी जिंवत असल्याचे दिसते. सर्व व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद होताना दिसून येत आहे.

याआधीही असे प्रकार...

सोशल मीडियावर याआधीही पाणीपुरी(panipuri)संबंधीत घडलेले प्रकार आपण पाहिले आहेत. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणाऱ्या पाणीपुरीसंबंधित असे व्हिडिओ आल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र सध्या आरोग्यासंबंधित गोष्टी आणि स्वच्छतेकडे अनेक खाद्य पदार्थांचे दुकान दुर्लक्ष करतात. अशा घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणा असो किंवा पाणीपुरी खाण्यारे नागरिक काही कालावधीसाठी जागे होतात मात्र यानंतरही असे प्रकार पुन्हा होताना दिसून येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT