धक्कादायक : उंदराऐवजी गमट्रॅप मध्ये अडकला नाग ! SaamTvNews
महाराष्ट्र

धक्कादायक : उंदराऐवजी गमट्रॅप मध्ये अडकला नाग !

यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शासकीय बंगल्यावर उंदीर पकडण्याच्या गम ट्रॅप मध्ये एक नाग अडकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शासकीय बंगल्यावर उंदीर पकडण्याच्या गम ट्रॅप मध्ये एक साप अडकून तडफडत असल्याची माहिती जिल्हाधिकारी (Collector) यांनी एम.एच.२९ हेल्पिंग हँडस् टीम चे संस्थापक व वन्यजीव रक्षक निलेश मेश्राम यांना कॉल करून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एम.एच.२९ हेल्पिंग हँडस् टीम चे सर्पमित्र जिल्हाधिकारी यांच्या घरी पोहचले.

हे देखील पहा :

या सर्पमित्रांना तिथे विषारी नाग (Snake) हा साप ट्रॅप मध्ये चिकटलेला आढळला, आणि लगेच त्याला कोणतीही इजा न होऊ देता कोकोनट (खोबरेल) तेलाच्या साहाय्याने ट्रॅप मधून नागाची सुटका केली. तरीही नागाच्या शरीरावर ट्रॅप मधी असलेला चिकटपणा एकदम घट्ट चिपकुन बसला होता. त्यामुळे यवतमाळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात साहाय्यक आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेंद्र अलोने आणि पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. व्ही. चव्हाण, व डॉ.तृप्ती वर्मा. यांच्या उपस्थिती मध्ये मार्गदर्शनात नागावर उपचार (Treatment) केले.

यावेळी टीम चे कार्य पाहून यवतमाळचे (Yavatmal) जिल्हाधिकारी येडगे म्हणाले की वन्यजीवांबद्दल तुम्ही जे काम करता, ते एकदम चांगले काम आहे. माझ्या माध्यमातून मी सुद्धा नागरिकांना सांगेल की कोठेही वन्यजीव धोक्यात असल्यास एम.एच.२९ हेल्पिंग हँडस् ला याची माहिती द्या आणि वन जीवन वाचविण्यास मदत करा. उपचारानंतर वनविभागात त्याची माहिती देऊन रीतसर नोंद करून नागाला निसर्गमुक्त करण्यात आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Maharashtra Water Dam : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, राज्यातील प्रमुख धरणं तुडुंब भरली; पाणीटंचाईचा प्रश्न सुटला

Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

SCROLL FOR NEXT