Nagpur Crime News Today Saam
महाराष्ट्र

Nagpur : नागपूरमध्ये खळबळ! मदरसा शिक्षकाकडून १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण; रात्रीच्या काळोखात भयंकर कृत्य

Nagpur Crime News Today : नागपुरातील एका मदरसामध्ये १० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप शिक्षकावर करण्यात आला आहे. पॉक्सो आणि बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

पराघ ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Nagpur madrasa teacher accused of abusing minor boys : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. येथील एका मदरसात चक्क १० अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शहरातील ताजबाग भागातल्या आशिर्वाद नगराला लागून तावीज नगरातील मदरसात हा प्रकार घडल्याचे समोर आले. अताय रसूल उर्फ तानिफ (२६) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

अताय रसूल उर्फ तानिफ हा मदरसातील मुलांना धार्मिक विधी शिकवत होता. त्यानेच मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षक अताय रसूल सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या मदरसात मुलांवर अत्याचार होत असल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर तक्काळ बीट मार्शलला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

मध्य प्रदेशातील एका १६ वर्षीय पीडित मुलाने मदरसा व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाचे नाव अताय रसूल ऊर्फ तालिफ (वय २६) असून तो आझाद कॉलनीचा रहिवासी आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीडित मुलगा अरेबिक आणि उर्दू शिकण्यासाठी तोहित नगरमधील गौसिया कॉलनीत असलेल्या मदरसात आला होता. १८ जूनच्या पहाटे ३ वाजताच्या सुमारास अताय मुलांच्या वसतिगृहात शिरला आणि त्याने झोपलेल्या पीडित मुलाचा विनयभंग केला. मुलाने प्रतिकार केला असता आरोपीने त्याला धमकावले. आरोपीने अशाच प्रकारे जवळच झोपलेल्या दुसऱ्या मुलासोबतही गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही बाब व्यवस्थापकाच्या कानावर आली, तेव्हा त्यांनी अतायची कानउघाडणी केली. मात्र, पोलीस तक्रार होणार असल्याचे समजताच आरोपीने मदरसा सोडून पळ काढला. तपासादरम्यान अशी माहिती समोर आली आहे की, आरोपीने अशाच प्रकारे तब्बल 10 मुलांचे लैंगिक शोषण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी मोठा खुलासा; 34 बोगस शिक्षक, प्रत्येकी ४,५०,००० ची ‘सेटिंग’

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Maharashtra News Live Update: पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

Nashik Fort : ४,८२९ फूट उंचीवर वसलेले नाशिकमधील ऐतिहासिक ठिकाण, किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य मन जिंकून घेईल

Badlapur Tourism: हिरव्यागार टेकडीवर वसलंय शिवकालीन जागृत खंडोबा मंदिर; भाविकांसाठी श्रद्धेचं अनोखं स्थान

SCROLL FOR NEXT