धक्कादायक! परळीत खुनाचे सत्र सुरुच; चाकूने वार करत महिलेचा खून Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! परळीत खुनाचे सत्र सुरुच; चाकूने वार करत महिलेचा खून

पैशाच्या देवाण घेवाणीवरून एका 50 वर्षीय महिलेचा चाकूने वार करत खून करण्यात आलाय. तर मुलगी गंभीर जखमी झालीय.

विनोद जिरे

बीड : बीडच्या (Beed) परळी तालुक्यात पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला आव्हान देणारी घटना समोर आलीय. पैशाच्या देवाण घेवाणीवरून एका 50 वर्षीय महिलेचा चाकूने वार करत खून (Murder) करण्यात आलाय. तर मुलगी गंभीर जखमी झालीय. शेख मदिना मजीद (वय 50 रा. परळी) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, शेख मुस्कान मजीद वय 20 असं गंभीर जखमी असलेल्या मयत महिलेच्या मुलीचे नाव आहे. (Beed Parli Murder Latest News)

हे देखील पहा :

मयत मदिना शेख या परळी (Parli) लगत असणाऱ्या शेतीमध्ये होत्या. यादरम्यान त्यांच्यावर पैशाच्या देवाणघेवाणीवरून चाकूने वार करण्यात आले. तर, मुलीला देखील मारहाण (Beating) झाली. यात शेख मदिना यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मुस्कान यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वीचं परळी परिसरातील जिरेवाडी परिसरात बहीण भावाची जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती. आज पुन्हा पैशाच्या कारणावरून महिलेचा खून करण्यात आलाय. यामुळे परळी तालुक्यात वाढत असणाऱ्या खुनाच्या सत्राने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT