Samruddhi Mahamarg Accident Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकला कारची मागून धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Accident News : सेलू तालुक्याच्या महाबळा परिसरातील धक्कादायक घटना

Shivani Tichkule

चेतन व्यास, वर्धा

Truck Car Accident : वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात रात्री साडे बारा वाजता दरम्यान घडला.

डॉक्टर ज्योती क्षीरसागर,डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे, भरत क्षीरसागर अशी मृतकाची नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांनी कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचत वाहतूक सुरळीत केली.

अपघात नेमका कसा झाला?

समृद्धी महामार्गाने (Samruddhi Mahamarg) नागपूरच्या दिशेने जातं असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली. या भीषण अपघातात मालेगाव (malegaon) येथून नागपूरला जातं असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू झाला. ज्योती क्षीरसागर आणि फाल्गुनी सुरवाडे या दोन्ही डेंटिस्ट डॉक्टर असून मैत्रीण आहे. (Accident News)

नागपूरला (Nagpur) कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जातं असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार ही समोरील ट्रकला मागून धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय.

जाम महामार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थ गाठत वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, याआधी देखील समृद्धी महामार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहे. त्यामुळे या अपघातांची मालिका कधी थांबणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये विराज प्रोफाइल कंपनीविरोधात आदिवासींचं बेमुदत धरणे आंदोलन; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Daily Habits: तुम्हीही नकळत करताय या चुका? शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम, आजच बदला सवयी

SBI Data Leak : SBI च्या खातेधारकांना मोठा धक्का, नाव, नंबर अन् पत्ता... ग्राहकांची संपूर्ण माहिती डार्क वेबवर लीक

Car Accident: काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या कारचा चक्काचूर; मुंबई-नागपूर हायवेवर भरधाव ट्रकची धडक, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT