Shocking News in Nashik Saam Tv News
महाराष्ट्र

Nashik: सासरच्या छळाला कंटाळली, महिलेनं २ मुलासंह विहिरीत उडी घेतली; माहेरच्या मंडळींना वेगळाच संशय

Woman Jumps Into Well With Kids: नाशिकमधील सौंदाणे गावात सासरच्या छळाला कंटाळून २८ वर्षीय हर्षाली अहिरे यांनी दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला.

Bhagyashree Kamble

सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेनं दोन चिमुरड्यांसह आत्महत्या केली आहे. शेतातील विहिरीत उडी घेत तिनं आपल्या मुलांसह आयुष्य संपवलं आहे. दरम्यान, माहेरच्या मंडळींनी सासरच्या सततच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप केला आहे. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हर्षाली राहुल अहिरे (वय २८) असं विवाहित महिलेचं नाव आहे. ती नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावातील रहिवासी होती. गेल्या काही वर्षांपासून त्यांना सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता, असा आरोप आहे. तिनं अखेर जाचाला कंटाळून स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. अशी मृत बालकांची नावे आहेत.

या घटनेची माहिती गावात पसरताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाईकांनी सासरच्या सततच्या मानसिक त्रासामुळे हर्षालीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे. यानंतर माहेरच्या मंडळींनी मालेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पती, सासू, सासरा आणि नणंद अशा चार जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट?

SCROLL FOR NEXT