Amravati Bhagyashree Saam Tv News
महाराष्ट्र

Amravati Case: कपडे आणण्यासाठी सासरी गेली, माहेरी परतलीच नाही; घरात आढळला मृतदेह, पती फरार

Amravati Crime Case: अमरावतीत कौटुंबिक वादातून संशयित आरोपी पतीनेच पत्नीची हत्या केल्याची माहिती आहे. पती पत्नीमध्ये वाद झाले, त्यानंतर भाग्यश्री माहेरी गेली. सासरी कपडे आणायला गेली असता पुन्हा भाग्यश्री परतलीच नाही

Bhagyashree Kamble

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र नगरमधील प्रभू कॉलनी परिसरात मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. ही खळबळजनक घटना २ जानेवारी रोजी उघडकीस आल्यानं महिलेची हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. भाग्यश्री अक्षय लाडे (वय वर्ष २८) असं मृत विवाहित महिलेचे नाव असून, फ्रेजरपुरा पोलीस फरार संशयित आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

मृत पत्नी भाग्यश्री यांचं सासर महादेव खोरीदरम्यान भवते लेआऊट परिसरात सासर आहे. तर राजेंद्र नगरमधील प्रभू कॉलनी परिसरात त्यांचं माहेर आहे. ७ वर्षांपूर्वी भाग्यश्री यांचं अक्षय लाडसोबत लग्न झालं होतं. त्यांना ५ वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय आणि भाग्यश्रीमध्ये कौटुंबिक वादातून खटके उडाले होते. पतीसोबत झालेल्या वादातून त्यांनी माहेर गाठलं.

१ जानेवारीला भाग्यश्री आपल्या दुचाकीवरून सासरी आपले कपडे आणायला गेली. मात्र ती माहेरी परतलीच नाही. त्यामुळे भाग्यश्रीच्या आईनं फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात भाग्यश्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने तातडीने दखल घेत भाग्यश्रीचा फोन ट्रेस केला. भाग्यश्री यांचे दुचाकी वाहन हे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आले आणि त्यातच तिचा फोन देखील असल्याचं आढळून आलं.

पोलिसांनी रेल्वे स्टेशन परीसरातील सीसीटिव्ही तपासले असता, भाग्यश्रीच्या पतीनेच भाग्यश्रीची दुचाकी रेल्वे परिसरात लावली असल्याचं निष्पन्न झालं. याच सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी भाग्यश्रीचे प्रभू कॉलनी परिसरातील घर गाठले. मात्र, घराला कुलूप लावलेले होते. परंतु पोलीस कर्मचारी योगेश श्रीवास यांना शंका आल्याने त्यांनी दाराचे कुलूप तोडले आणि घरात प्रवेश केला. त्यावेळी भाग्यश्री यांचा मृतदेह बेडरूममध्ये आढळलं.

भाग्यश्री यांच्या मानेवर आणि पायावर चाकुने वार केल्याचे निशाण होते. पोलिसांनी या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम बोलावली असून, त्यांनी केलेल्या तपासानुसार पतीनेच भाग्यश्री यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत असून, पोलीस संशयित आरोपी पतीचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT