Kolhapur Crime Sam Tv
महाराष्ट्र

Shocking News: '३ लाख रुपये दे, बायकोला घेऊन जा'; तरुणाला पत्नीच्या बॉयफ्रेंडचा फोन, प्रेमसंबंधातून भयंकर प्रकार

Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये प्रेमसंबंधातून भयंकर घटना घडली. '३ लाख रुपये दे आणि तुझ्या बायकोला घेऊन जा', असा फोन एका तरुणाला पत्नीच्या बॉयफ्रेंडकडून आला. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

रणजित माजगावकर, कोल्हापूर

'३ लाख रुपये दे आणि तुझ्या बायकोला परत घेऊन जा...' अशी धमकी चक्क एका तरुणाला त्याच्या बायकोच्या बॉयफ्रेंडने दिली. कोल्हापूरातील राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या तरुणाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या तरुणाची बायको आणि तिच्या बॉयफ्रेंडविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली दोन वर्ष काम करत आहे. २०२३ मध्ये लखन बेनाडे याची ओळख लक्ष्मी लोंढे या महिलेसोबत झाली होती. मात्र लक्ष्मी लोंढेचे विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. दरम्यान विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाल्यामुळे लक्ष्मीने विशालच्या जाचाला कंटाळून आपली सोडवणूक व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला. आणि त्याच्यासोबतच लग्न करण्याचा बनाव केला.

लखन बेनाडे आणि लक्ष्मी लोंढे यांचे लग्न २०२४ मध्ये झाले होते. लग्न होताच लक्ष्मीने पुन्हा विशाल गस्तेच्या मदतीने लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांचे निमित्त करून लक्ष्मीने लखनकडून ८ लाखांहून अधिकची रक्कम हडप केली. लखन बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीने सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखनला सोडून विशाल गस्तेसोबत पुन्हा पळून गेली.

'तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे.', अशी धमकी चक्क लक्ष्मी बेनाडेच्या बॉयफ्रेंडने लखन बिनाडेला दिली आहे. लक्ष्मी बॉयफ्रेंडसोबत पुन्हा पळून जाऊन तिने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच लखन बेनाडेने कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT