Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: 'तुझा संतोष देशमुख करतो' गाडी अडवत कोयत्यानं सपासप वार; डोकं अन् मानेतून रक्ताच्या धारा

Beed Latest Crime News: बीडमध्ये शेतीच्या वादातून एका तरुणावर कोयत्याने हल्ला. १० पेक्षा अधिक वार. प्रकृती चिंताजनक. गुन्हा दाखल नाही, कुटुंबीयांचा पोलीस प्रशासनावर आरोप.

Bhagyashree Kamble

शेतीमधील बांधाच्या वादावरून बीडमध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. 'तुझा संतोष देशमुख करतो', अशी धमकी देत भररस्त्यात आरोपीने तरूणावर कोयत्याने सपासप वार केले. शरीरावर १०० हून अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे. तरूणाची स्थिती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर हल्ल्यानंतरही बीड ग्रामिण रूग्णालयात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

कैलास सांगुळे असं जखमी तरूणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कैलास गाडी चालवत होता. यादरम्यान, चार जणांनी त्याची वाट अडवली. तसेच कोयत्याने डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केला. हल्लेखोरांनी ‘तुझा संतोष देशमुख करतो, याला जीवे मारा’ अशी धमकी देत त्याला मारहाण केली. हल्ला झाल्यानंतर तरूण बेशुद्ध अवस्थेत पडला.

यानंतर त्याच्या भावाने घटनास्थळी धाव घेत भावाला बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कैलासवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

यानंतर कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करीत आक्रोश व्यक्त केला आहे. “माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल,” असं म्हणत कुटुंबाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपी मोकाट असून, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ऑगस्टचे ₹१५०० खात्यात जमा होण्यास सुरूवात, लाडक्या बहिणींनो पैसे आले का? असं करा चेक

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक आज दुपारी दोन वाजेपर्यंत बंद

Latur OBC News : मराठा आरक्षणासाठी GR, ओबीसी तरूणाने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत काय लिहिले?

Karishma Sharma Accident: धक्कादायक! धावत्या मुंबई लोकलमधून अभिनेत्रीने मारली उडी; कारण आलं समोर

Budhaditya Rajyog: 17 सप्टेंबरला चमकणार 'या' राशींचं नशीब; 1 वर्षाने होणार बुध-सूर्याची युती

SCROLL FOR NEXT