Shocking Incident in Solapur Barshi Saam
महाराष्ट्र

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Shocking Incident in Solapur: बार्शी तालुक्यात युवकाचा गाडीत मृतदेह आढळला. गोळीबारातून मृत्यू, आत्महत्या की खून याबाबत संभ्रम. मृत युवकाची ओळख गोविंद जगन्नाथ बर्गे (३८, बीड) अशी झाली.

Bhagyashree Kamble

  • बार्शी तालुक्यात युवकाचा गाडीत मृतदेह आढळला

  • गोळीबारातून मृत्यू, आत्महत्या की खून याबाबत संभ्रम

  • मृत युवकाची ओळख गोविंद जगन्नाथ बर्गे (३८, बीड) अशी झाली

  • गाडीत पिस्तूल आढळल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू

बीडच्या लुखामसला येथील उद्योजक गोविंद बरगे यांचा मृतदेह सोलापुरातील बार्शी गावात आढळल्यानं खळबळ उडाली. बरगे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. प्रेयसीची भेट घेण्यासाठी ते सोलापुरात गेले होते. मात्र, त्यांचा मृतदेह कारमध्ये आढळला. त्यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. दरम्यान,पोलिसांकडून तपास सुरू असून, बरगे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? याचा तपास सुरू आहे.

गोविंद जगन्नाथ बरगे असे मृत तरूणाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील रहिवासी होते. बरगे हे प्लॉटिंगचे व्यवसाय करत होते. त्यांचा व्यवसायात चांगला जम बसलेला होता. यादरम्यान त्यांचा संपर्क पारगाव थिएटरमधील नर्तिकेशी आला. दोघांची जवळीक वाढली. दोघांचेही प्रेमसंबंध निर्माण झाले.

या काळात बरगे यांनी प्रेयसीला सोन्याचांदीच्या नाण्यासह पावणेदोन लाखांचा मोबाईल गिफ्ट केला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला. वाद मिटवण्यासाठी बरगे सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात गेले. चारचाकीतून त्यांनी गाव गाठलं.सोमवारी मध्यरात्री ते प्रेयसीच्या घरात पोहोचले, अशी माहिती समोर आली आहे.

मात्र, त्यानंतर गावकऱ्यांना कारमध्ये बरगे यांचा मृतदेह दिसला. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता त्यांना एक युवक गाडीमध्येच मृत अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांच्याजवळ एक पिस्तूलही आढळून आले असून, त्यातूनच त्यांनी स्वत: वर गोळीबार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद आढळून आल्या आहेत. त्यामुळे बरगे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT