Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : हॉट आहेत का? ... मैत्रिणीचे कपडे बदलताना व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवले; इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरमधील इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये मैत्रिणीनेच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ चोरून काढून प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • इंजिनीअरिंग कॉलेज होस्टेलमधील धक्कादायक प्रकार उघड

  • मैत्रिणीनेच मैत्रिणीचे खासगी व्हिडिओ चोरून काढले

  • व्हिडिओ प्रियकराला पाठवल्याचे तपासात उघड

  • सिडको पोलिसांनी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल

माधव सावरगावे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच दुसऱ्या तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित केले. एवढ्यावरच न थांबता या तरुणीने मैत्रिणीचे हे व्हिडिओ आपल्या प्रियकराला पाठवले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या दोघीही अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून गेल्या तीन वर्षांपासून एकाच वसतिगृहात राहत होत्या. १९ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद संभाषण करत असल्याचे पीडितेच्या लक्षात आले.

फोनवर बोलताना “फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?” असे शब्द वापरत असल्याचे ऐकून पीडितेचा संशय बळावला. त्यानंतर पीडितेने आरोपी तरुणीला रंगेहाथ पकडत तिचा मोबाइल ताब्यात घेतला. पासवर्ड विचारून मोबाइल तपासला असता कपडे बदलतानाचे आपलेच व्हिडिओ आरोपी तरुणीने चोरून काढून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचे उघड झाले.

या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या पीडित तरुणीने तात्काळ सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्टसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: BP नियंत्रणात ठेवण्यासाठी ही 5 पदार्थ खाणं अजिबात टाळू नका

Amruta Khanvilkar : क्या खूब लगती हो, बडी सुंदर देखती हो, पाहा अमृताचं लेटेस्ट PHOTOS

Accident News : पुण्यात हिट अँड रनचा थरार! मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेला भरधाव कारने उडवलं

Ardha Kendra Yog: 30 वर्षांनंतर शनी-बुध बनवणार दुर्मिळ योग; या राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

Maharashtra Live News Update: महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार निश्चित

SCROLL FOR NEXT