Activist Anjali Damania Questions Govt After Mysterious Death Saam
महाराष्ट्र

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

Activist Anjali Damania Questions Govt After Mysterious Death: डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणात अंजली दमानिया आक्रमक. 'राज्यात नेमकं काय सुरूय?' असा सवाल केला उपस्थित.

Bhagyashree Kamble

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी वरळी येथील राहत्या घरात आत्महत्या केली. राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचं कुटुंबियांनी म्हटलं आहे. दरम्यान, लग्नाच्या ९ महिन्यांनंतर गौरी यांना अनंत यांच्या अनैतिक संबंधाबाबात माहिती मिळाली होती. या प्रकरणात पोलीस तपासातून अनेक धागेदोरे सापडत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक खुलासे केले.

या प्रकरणावर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया म्हणाल्या, 'पुणे, फलटण अन् आता गौरी पालवे गर्जेची आत्महत्या. हे राज्यात नेमकं काय सुरूये?', असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. तसेच गौरी यांना मारहाण, नणंदेकडून 'नांदायचं असेल तर, नांद नाहीतर त्याचं दुसरं लग्न लावून देऊ', असा मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती गौरी यांच्या मैत्रिणींनी दिली असल्याचं दमानिया यांनी सांगितलं.

'गौरी स्ट्ऱाँग मुलगी होती. ती आत्महत्या करेल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आता न्याय कशाला म्हणायचं हे कळत नाहीये', असं दमानिया म्हणाल्या. 'या प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांखाली तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर पुढचं चित्र स्पष्ट होईल. पोलीस तपास करीत आहेत', अशी माहिती दमानिया यांनी दिली.

यावेळी बोलताना दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना विनंती केली, 'मला यात राजकरण आणायचं नाही. पण नक्कीच दु:ख होत आहे. पंकजा मुंडे यांनी कारवाई करा, असं तरी म्हणायला हवं होतं. पंकजा मुंडे यांनी या मुलीसोबत उभं राहायला हवं. माझा PA जरी असला तरी, या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे त्यांनी सांगावे', अशी विनंती दमानिया यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे युती घडवण्यामागील ते अदृश्य हात म्हणजे मुख्यमंत्रीच

Shahi Tukra Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी शाही टुकडा, वाचा सोपी रेसिपी

Smriti Mandhana Wedding: स्मृती मानधनाच्या वडिलांना हार्ट अटॅक, विवाहसोहळा रद्द

पुण्यात खळबळ! चिमुकल्या बहीण - भावाचा मृतदेह शेततळ्यात सापडला, बिबट्याचा हल्ला की आणखी काही?

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT