shirdi  Saam tv
महाराष्ट्र

Shirdi Crime : शिर्डीत खळबळ! मैत्रीत वादाची ठिणगी, किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार शस्त्राने सपासप

Shirdi Crime News : शिर्डीत खळबळ उडाली आहे. शिर्डीत मैत्रीत वादाची ठिणगी पडली, त्यानंतर दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही

शिर्डीत गुन्हेगारी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीत दोन मित्रांनी वादानंतर एकमेकांवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केल्याची घटना घडली आहे. शिर्डीत गणेशवाडीत परिसरात हा गुन्हा घडला आहे. दोन्ही मित्रांनी केलेल्या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीत दोन मित्रांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दोन मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर जीवघेण्यात हल्ल्यात झाले. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. शिर्डीत गणेशवाडी परिसरात घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शिर्डीच्या गणेशवाडीतील साई त्रिभुवन आणि आशिष जाधव या दोन मित्रांचा किरकोळ वाद झाला. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार केले. या जीवघेण्यात हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शिर्डीतील साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसही पोहोचले. पोलिसांनी तातडीने दोघांचेही जबाब नोंदवण्याचे काम सुरु केले. दोन मित्रांमधील किरकोळ वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

दरम्यान, शिर्डीत काही दिवसांपूर्वी एका भाजी विक्रेत्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं. सादिक शेख असे हल्ला झालेल्या तरुणाचं नाव होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT