Aurangabad Now become Sambhajinagar Saamtv
महाराष्ट्र

Education News: शिक्षण विभागाचा अजब कारभार! चक्क बंद शाळेला मिळाले अनुदान; अधिकारीही चक्रावले

Chhatrapati Sambhajinagar News: बंद शाळेचे नावे अनुदान यादीत आले कसे? असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधील सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

Gangappa Pujari

नवनीत तापडिया, प्रतिनिधी...

Chhatrapati Sambhajinagar News: राज्यातील काही विनाअनुदानित शाळा नुकत्याच अनुदानावर आल्या आहेत. अनेक वर्षांनंतर या शाळांना 20 टक्के अनुदान मंजूर झाले. पण छत्रपती संभाजीनगर शहरातील एका बंद शाळेलाही अनुदान मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर आता आता उपसंचालक कार्यालयाने याबाबत शिक्षण विभागाला सविस्तर अहवाल पाठवला आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मराठी प्राथमिक शाळा या शाळेला अनुदान मंजूर झाले आहे. मात्र प्रत्यक्षात ही शाळा बंद पडलेली असल्याचे समोर आली आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाचा (Eduacation Department) भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

आता या बंद शाळेचे नावे अनुदान यादीत आले कसे? असा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधील सर्व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने यासंबंधीचा अहवाल शिक्षण उपसंचालक मंडळाला पाठवला असून यामध्ये अशी एकच शाळा आहे जी बंद असून तिचे नाव अनुदान यादीत आले आहे. मात्र त्या शाळेचा प्रस्ताव आम्ही दिला नसल्याचे देखील या पत्रात प्राथमिक विभागाने सांगितले आहे.

याबाबत आता ही शाळा मागील बऱ्याच काळापासून बंद असून या शाळेचा अहवाल कधी पाठवण्यात आला होता याची चौकशी करून संचालक मंडळाला आम्ही अहवाल पाठवू अशी माहिती उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली आहे. तसेच मात्र एकीकडे शिक्षण विभाग सांगते की ही शाळा मागील बऱ्याच काळापासून बंद आहे मात्र कधीपासून शाळा बंद झाली याची देखील माहिती शिक्षण विभागाकडे नाही.

ही शाळा मागील काही वरच्या अगोदर कदाचित चालू असावी त्यामुळे या शाळेचा प्रस्ताव अनुदानासाठी गेला असावा मात्र याची आम्ही संचालक मंडळाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करू आणि यानंतर अशा बंद शाळांना अनुदान जाणार नाही याची काळजी घेऊ, असं उपसंचालक अनिल साबळे यांनी सांगितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डॉक्टरच्या बायकोला जाळ्यात अडकवलं; प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, लाखो पैसे लुबाडले, अखेर..

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीचा पहिला चित्रपट कोणता होता?

Raj Thackeray : निवडणुकीत गाफील राहू नका, कारण...; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश

Margtamhane Tourism: गरम पाण्याचा झरा अन् समुद्रकिनारा; मार्गताम्हाणे गावातलं Hidden स्पॉट तुमचं मन जिंकेल

Maharashtra Live News Update: सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळूरू विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरु

SCROLL FOR NEXT