Nagpur Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Accident: वाहन चालवायला शिकताना अनर्थ घडला! कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू

Nagpur Car Accident: नागपूरमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कार चालवायला शिकताना ही घटना घडली. या घटनेमुळे नागपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

पराग ढोबळे, नागपूर

नागपूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. कार विहिरीमध्ये कोसळून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूरच्या बुटीबोरीमध्ये हा अपघात झाला. बुटीबोरी येथे राहणारे हे तिघे तरुण कारने एमआयडीसी परिसराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बुटीबोरी येथे सोमवारी रात्री ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास कार विहिरीमध्ये कोसळून अपघात झाला. या कारमधून तीन तरुण एमआयडीसीकडे जात होते. त्याचवेळी कार रस्त्यालगत असलेल्या कठडा नसलेल्या विहिरीत कोसळली. कारमध्ये असलेले तिघेही जण कारमध्येच अडकून राहिले. वेळीच बाहेर निघू न शकल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत कार विहिरीतून बाहेर काढली. पण तोपर्यंत तिघांचाही कारमध्येच मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या ३ तरुणांपैकी एक जण कार चालवणे शिकत होता. त्याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT