Medical Worker Beaten For 30 Rupees
Medical Worker Beaten For 30 Rupees SAAM TV
महाराष्ट्र

Video: धक्कादायक! 30 रुपयांसाठी मेडिकल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण! CCTV फुटेज व्हायरल

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे

Medical Worker Beaten For 30 Rupees : मुंबईच्या चारकोप परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या 30 रुपयांसाठी मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला चार-पाच जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज वायरल झाल्यानंतर चारकोप पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्वांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डहाणूकरवाडी असर मेडिकल शॉपमध्ये एक मुलगा औषध विकत घेण्यासाठी आला. औषध विकत घेतल्यानंतर त्याने गुगल पे द्वारे औषधाचे बिल दुकानदाराला दिले. 30 रुपये जास्त दिल्याचे दुकानदाराच्या लक्षात आणून देत तरुणाने पैशाची मागणी केली.

कर्मचाऱ्याची खात्री झाल्यानंतर त्याने 30 रुपये औषध खरेदी करणाऱ्याला परत केले. मात्र यांच्यात काही बाचाबाची झाली. यानंतर रात्री पावणे 12 वाजण्याच्या सुमारास त्या मुलाने त्याचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांना सोबत घेऊन येत मेडिकल दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही मारहाणीची घटना व्हायरल झाले सीसीटीव्ही (CCTV) फूटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. ()

यानंतर चारकोप पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या सर्व व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चारकोप पोलिसांनी आयपीसी कलम ३२४, ४२७,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सुनील सुरेश पवार (24), सुरेश पवार (50) आणि नीलम पवार (48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत. (Viral Video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT