Shock in Shani Shingnapur Saam Tv News
महाराष्ट्र

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Shock in Shani Shingnapur: शनिशिंगणापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केली.

ही घटना सोमवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी घडली.

आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही.

पोलिसांकडून सध्या तपास सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

शनिशिंगणापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली? अद्याप कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नितीन शेटे हे शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी होते. त्यांचा सोमवारी सकाळी राहत्या घराच्या छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली.

ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलं. तसेच शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवलं. दरम्यान, शेटे यांच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अस्पष्ट आहे. त्यांनी आत्महत्या का केली? हत्या आहे की आत्महत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेमुळे शनिशिंगणापूर गावात शोककळा पसरली आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT