Shock in Aurangabad Saam Tv News
महाराष्ट्र

तासाभरात येतो म्हणत घराबाहेर पडला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; उद्योजकासोबत नेमकं काय घडलं?

Shock in Aurangabad: छत्रपती संभाजीनगरजवळ दौलताबाद पुलाखाली प्रसिद्ध उद्योजक सागर परळकर यांचा मृतदेह आढळला. अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू आहे.

Bhagyashree Kamble

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दौलताबाद येथील धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी टोलनाक्याजवळील पुलाखाली सोमवारी दुपारी मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाईल आणि आधार कार्ड सापडल्यामुळे ओळख पटली असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सागरभाऊ परळकर असे उद्योजकाचे नाव आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह धुळे सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली आढळला. रविवारी दुचाकीनं ते कन्नडच्या दिशेनं निघाले होते. मात्र, त्यानंतर ते पुन्हा घरी परतलेच नाही. सोमवारी दुपारनंतर त्यांचा थेट मृतदेह आढळला.

उद्योजकाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अधिक चौकशी केली. पोलिसांना मृतदेहाशेजारी मोबाईल आणि आधार कार्ड आढळले आहे. आधार कार्डवरून सागर यांची ओळख पटली. त्याच ठिकाणी त्यांची दुचाकी तुटलेल्या अवस्थेत आढळली. त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबाला याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

सागरभाऊ परळकर कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, सागर आपल्या कुटुंबासह कांचनवाडीत राहत होते. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये भागीदारीत पुष्पक अॅग्रो कंपनी असून, त्या ठिकाणी ते संचालक या पदावर कार्यरत होते. दरम्यान, रविवारी ९ वाजता ते दुचाकीवरून कंपनीच्या कामानिमित्त दुचाकीनं कन्नडच्या दिशेनं गेले. त्यांनी यादरम्यान, शेवटचा बायकोला फोन केला. 'मी हतनूरजवळ आहे, तासाभरात येतो', असं त्यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांना कळली.

हा घात आहे की घातपात? असा संशय सध्या उपस्थित होत आहे. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, घातापाताच्या दिशेनंही तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT